- राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष आशिष खांडगे यांची दुरुस्तीची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव स्टेशन प्रतिनिधी (दि. ३० मे २०२४) :- तळेगाव स्टेशन चौक ते एसटी स्टॅन्ड येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
तळेगाव स्टेशन चौक ते एसटी स्टॅन्ड, महाराष्ट्र बँक ते चाकण रोड येथील रस्त्यावर वाहनांची आणि लोकांची रहदारी खूप असते. वाहनांचा सतत वावर या रस्त्यावर असतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पावसाआधी येथील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करून रस्त्यांची डागडुजी करावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तळेगाव शहर अध्यक्ष आशिष खांडगे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे.















