न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२४) :- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सचिव संजय बोरा यांच सोमवारी (दि. १०) रोजी सकाळी निधन झाले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांनी शहरातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रात पत्रकारिता केली आहे. ते आजही या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.