न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२४) :- सहा जणांनी संगणमत करुन पिडीत १७ वर्षे, ०७ महिन्यांच्या मुलीचा आरोपी २७ वर्षीय तरुणाशी बालविवाह लावला. ही घटना (दि १२) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास सोळु गावातील विश्वविलास मंगल कार्यालय, ता. खेड जि पुणे येथे घडली.
याप्रकरणी फिर्यादी पिडीतेने १. भाउसाहेब विष्णु कुंभार (वय-४५ वर्षे, रा. उरुळी कांचन), २. महिला आरोपी, ३. महिला आरोपी, ४. एकनाथ मास्ती कुंभार (वय ६५ वर्षे, रा.आंबेगाव, मोरगाव जि.पुणे), ५. निखिल एकनाथ कुंभार (वय.२७ वर्षे, रा. आंबेगाव, मोरगाव जि. पुणे), ६. शंकर शिरसागर (वय. ५५ वर्षे रा आळंदी, ता.खेड जि पुणे) यांच्या विरोधात सरकातर्फे फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी १८३/२०२४ बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९,१०,११ प्रमाणे वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि साळी पुढील तपास करीत आहेत.















