न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२४) :- अनोळखी व्यक्तीने मी ‘एम.एन.जी.एल. कंपनीतुन बोलत असुन तुम्ही गॅस बिलाचे पेमेंट कसे करता? व गॅस बिलाचे पेमेंट करण्यासाठी आमच्या एम.एन.जी.एल. कंपनीच्या अॅपचा वापर करा’ असे फोनवरून सांगितले.
ए.टी.एम. कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक अकाऊंट नंबर विचारला. फिर्यादीच्या मोबाईल नंबरच्या व्हॉटस अॅप वर एक लिंक पाठवीली. ती लिंक ओपन करुन माहीती भरण्यास सांगीतली. लिंक ओपन करुन त्यामध्ये माहीती भरली. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने ‘मला तुमचे अकाऊंट अपडेट झाले आहे’ त्याची अपडेशन फि १२/- रुपये डेबीट कार्डने भरा, असे सांगीतले.
फिर्यादीचे मोबाईल नंबरच्या व्हॉटस अॅप वर एक ए.पी. के. फाईल पाठवीली असता फिर्यादी यांनी ए.पी. के. फाईल ओपन करुन त्यामध्ये डेबीट कार्डची माहीती भरली. १२ रुपये पेमेंट केले असता व्यक्तीने फिर्यादीस बोलण्यात गुंतवुन ठेवुन बँक अकाऊंट मधुन एकुण २,९४,५०० रुपये काढुन घेवुन फिर्यादीची ऑनलाईन फसवणुन केली आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि ०८) रोजी सायंकाळी ०६.१५ च्या सुमारास घडला. पुरुष फिर्यादी (वय ६८ व्यवसाय सेवानिवृत रा. पिंपरी) यांनी एक अनोळखी इसम (त्याचा मोबाईल नंबर ९३३२६२९८४९) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ५६५/२०२४ भा.दं.वि. कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मपोउपनि उबाळे पुढील तपास करीत आहेत.

















