न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०१९) :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली आज गुरुवार (दि. २) रोजी कुदळवाडी ते मोईफाटा परिसराला भेट दिली.
या परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी डोडल व शिंदे यांच्यासोबत परिसरात दौरा करून, वस्तुस्थितीची त्यांना प्रत्यक्ष जाणीव करून दिली. तसेच पाईपलाईनचे त्वरित काम मार्गी लावण्याच्या सुचनाही केल्या.











