न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २ मे २०१९) :- मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेले तीन जण आज सकाळी धरणात बुडाले आहेत. यात दोन मुले आणि एक मुलीचा समावेश आहे.
हे सर्व भारती विद्यापीठचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, एका मुलीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी मृतांची नावे आहेत.
ही मुलं त्यांच्या ग्रुपसह येथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आलले असल्याचे समजते. सकाळी हे सर्व धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरले असताना ही घटना घडली, अशी माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.











