न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०१९) :- विक्रीसाठी घेवून जात असलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गावर केली असून, दोघांना अटक केली आहे.
योगेश दत्तात्रय जोध (वय २८, रा. ७७, चंदननगर, जुळे सोलापूर, डी मार्ट जवळ, जि. सोलापूर), सागर दिगंबर कदम (वय २८, रा. वामननगर, जुळे सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.











