- पोलीस सहआयुक्त वसंत परदेशींकडून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास २८ जून पासून सुरुवात झाली आहे. देहूपासून पुणे शहरापर्यंतच्या प्रवासात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या १५४ सुरक्षा एसपीओ, स्वयंसेवक, पोलीस मित्रांनी प्रशासनास मदत केली. त्याचप्रमाणे पर्यावरण विभागाच्या सदस्यांनी प्लास्टिक बॉटल संकलन करून देहू परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
याप्रसंगी सहआयुक्त वसंत परदेशी यांनी स्वयंसेवकांच्या सेवा कार्याची माहिती जाणून घेतली. वारी सेवा कार्याच्या सहभागाबद्दल संस्था अध्यक्षांनी देहूत सुरू असलेल्या सामाजिक सेवा सहभागाची त्यांना माहिती दिली.
पोलीस सहआयुक्त परदेशी म्हणाले, ” वारी सोहळ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे कर्तव्य मोठ्या जबाबदारीने पार पडावे लागत असते. त्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचा अश्या पद्धतीने सेवा सहभाग नक्कीच महत्वपूर्ण आहे. या पुढेही अनुभवी सेवाभावी संस्थांचा वार्षिक उत्सव कार्यक्रमांमध्ये एसपीओ, पोलीस मित्रांची मदत घेतली जाईल.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,” दरवर्षी प्रमाणे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या एसपीओ, पोलीस मित्र ,स्वयंसेवकांनी प्रशासनास पालखी सोहळ्यात सेवा पुरवली.संस्थेचे सर्व उच्चशिक्षित सदस्य, अभियंता, पर्यावरण अभ्यासक, वैद्यकीय प्रतिनिधी, गुणवंत कामगार, विशेष कार्यकारी अधिकारी, आय टी सेल प्रतिनिधी, उद्योगक्षेत्रातील व्यवस्थापन प्रतिनिधी, माजी होमगार्ड सदस्य यांनी या सेवा कार्यात सहभाग घेतला. यंदाच्या वर्षीही प्लास्टिक मुक्त वारी, हरित वारी तसेच आरोग्ययुक्त वारी असे तीन प्रमुख सामाजिक वारी उपक्रम सुरू आहेत.”
सोहळ्यातील बंदोबस्त संदर्भातील मार्गदर्शन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहा पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार , एल आय बी पोलीस अजित सावंत यांनी केले.
देहूतील प्रमुख ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त विभाग प्रमुख विशाल शेवाळे, सतिश देशमुख, लक्ष्मण इंगवले, राजेंद्र कुंवर, राम सुर्वे, संतोष चव्हाण, संदीप नाना कुंबरे, बळीराम शेवते, अमोल कानू,संदीप कांबळे, अंकुश घारे, जयप्रकाश शिंदे, तुकाराम दहे, किरण चौधरी महिला विभाग प्रमुख प्रतिभा कांबळे, वैशाली पवळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, नंदिनी शेवाळे, सौज्ञा पवार व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला.