न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून गणेशनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश माने व महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे नागरिकांच्या सुरक्षितेप्रती करीत असलेल्या कामाचे कौतुक करून कृतज्ञता भेट देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, उपाध्यक्षा कुमुदिनी घोडके, विमल निंबाळकर, सचिव प्रदीप बोबडे, ज्येष्ठ पत्रकार अनिल वडघुले, सदस्य प्रकाश पवार, नारायण उघडे, पांडुरंग लोहार, भैरू गायकवाड, सदानंद अमृते, दिनकर घोडके, दिगंबर देशमुख व पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
निवडणुकीच्या काळात पोलिसांनी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सेवा केली. तसेच त्यांच्या सोबतच निवडणुकीच्या दिवशी महिला पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले. म्हणून त्यांच्या प्रती पोलसांचे कौतुक करून ज्येष्ठ नागरिक संघ तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.











