न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात प्रचंड दुष्काळ आहे. पाण्याआभावी जनावरांची ससेहोलपट सुरु आहे. पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही आ-वासून उभे आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या आहेत.
या चारा छावणीस पिंपरी चिंचवड महापालिकेचे गटनेते व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी भेट दिली. येथील दुष्काळी भाग व जनावरांसाठी उभारलेल्या चारा छावणीची पहाणी व माहिती त्यांनी घेतली.
पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही तातडीने सुटले पाहिजेत. तातडीने आणखी छावण्या या परिसरात सुरु झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर तहसीलदारांनी टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत, यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन चिखले यांनी यावेळी येथील शेतकऱ्यांना दिले.











