- पालिकेकडून आवश्यक कागदपत्रांची मुदतीत पूर्तता नाहीच..
- शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आकुर्डी व पिंपरी येथे निवासी गाळे उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना लाभार्थी हिश्श्याची शंभर टक्के रक्कम भरण्याबाबत सूचना केल्या आहेत.
सद्यस्थितीत लाभार्थी नागरीकांना बँक कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. घर कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे बँकांकडून मागितली जातात. मंजूर ले आऊट, पूर्णत्वाचा दाखला, रेरा प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची मागणी केली जाते.
ही कागदपत्रे झो.नी.पू, चिंचवड येथे उपलब्ध करून द्यावीत. तसेच प्रकल्पाचा लाभार्थी हिस्सा विहित मुदतीत देखील वाढ करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.