न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ३ मे २०१९) :- भोसरीतील ‘डी’ सेक्टरमधील पवना कॉम्प्लेक्स येथे गाळा क्रमांक २१ मध्ये प्रिंटिंग प्रेसला आज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.
या आगीत सहा प्रिंट मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.











