न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ३ मे २०१९) :- म्हाळुंगे, बालेवाडी येथे सुरु असलेल्या पुराणिक बिल्डरच्या बांधकाम साईटवर मजूर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह आढळला आहे. गळ्यात आणि तोंडात टॉवेल असल्याने हा खुनाचा प्रकार असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
रवींद्र शहा (रा. कामगार वसाहत, म्हाळुंगे, मूळ- झारखंड) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाळुंगे, बालेवाडी येथे पुराणिक बिल्डरची बांधकाम साईट आहे. या ठिकाणी झारखंड येथील कामगार काम करतात. गेली दोन दिवस रवींद्र हा कामावर आला नव्हता. त्यामुळे आज सकाळी त्याचे इतर सहकारी त्याला पाहण्यासाठी तो राहत असलेल्या खोलीत गेले.
त्यावेळी रवींद्र हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तसेच त्याच्या तोंडात आणि गळ्याला टॉवेल अडकवलेल्या आवस्थेत तो होता. पोलिसांना माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले. तपास सुरु आहे.











