- दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यानंतर दीड तासात वाहतूक पूर्वरत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- चिखलीतील मोरे पाटील चौक अंतर्गत रस्ता बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पडलेले झाड दीड तासानंतर हटविण्यात यश आले. याबाबत दिनेश यादव यांना माहिती मिळताच चिखली अग्निशमन विभागाला याबाबत सूचना देत तातडीने झाड हटविण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
कुदळवाडी येथे कस्तुरी प्लोरा येथे हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काल देखील या रस्त्यावर पाऊसामुळे वाहतुकीच विस्कळीत झाली होती. आज पुन्हा जवळपास तासभर होत आला तरी हे झाड हटवले गेले नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान याबाबत दिनेश यादव यांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला होता. यामुळे लवकरात लवकरच हे काम स्वतः थांबून करून घेतले.











