न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- फेसबुक प्रोफाईल पेजवर स्वतः तलवार हातात घेवुन असणारा फोटो पोस्ट केला. शस्त्रे, अस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे अथवा बाळगणे याबाबत मनाई आदेश आहे.
तरीही आदेशाचा भंग करुन, अवैधरित्या १०००/- रु किं ची एक धारदार लोखंडी तलवार बाळगली असताना आरोपी मिळुन आला. हा प्रकार (दि. २३) रोजी रात्री ८.३० वा.चे सुमारास कोलॅसिंस सोसायटी शेजारील, लेबर कॅम्प, जाधववाडी, चिखली येथे राहत्या घरी घडला.
लड्डुलाल साहेबुद्दीन शर्मा ऊर्फ सुरज सुमार (वय २२ वर्षे) याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात ४२६/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पो हवा ९६४ नांगरे पुढील तपास करीत आहेत.











