- वाहतूक विभागाची माहिती; हे आहेत पर्यायी रस्ते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, याशिवाय खेड आणि मावळ तालुक्यातील जलमय रस्ते बंद करण्यात आले आहेत.
याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडून बंद केलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग याची माहिती देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे…
दिघी-आळंदी…
- आळंदी ते चाकणकडे जाणाऱ्या रोडवरील केळगाव बायपास ब्रिज, चाकण ब्रिज, नगरपरिषद ब्रिजवर पाणी आल्याने या ब्रिजवरुन दोन्ही बाजूची वाहतुक बंद करण्यात आली आहे.
- ही बंद केलेली वाहतूक पुण्याकडून देहूफाटा चौक डावीकडे वळून मोशी मार्गे इच्छित स्थळी जातील. च-होली फाटा उजवीकडे वळून पीसीएस चौक मरकळ चौक चाकण चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. चाकणकडुन येणारी वाहतूक चाकण चौक-मरकळ चौक-पीसीएस चौक उजवीकडे वळून च-होली फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मरकळ ते शिक्रापूरकडे जाणाऱ्या रोडवरील मरकळ ब्रिज वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
- वाहतूक ही मरकळ गाव डावीकडे वळून कोयाळी कमान उजवीकडे वळून शेलपिंपळगाव डावीकडे वळून रसिका हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जाईल.
तळेगाव…
- तळेगाव तळे ओव्हर फ्लो झाल्याने तळेगाव गावठाणकडून सोमाटने गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
- वाहतूक ही मालिब फाटा-तळेगाव खिंड-सोमाटणे फाटा अशी जाईल.
- हिंदमाता अंडरपासमध्ये पाणी भरल्याने हिंदमाता अंडरपास सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
- ही वाहतूक काका हलवाई चौक स्टेशन चौक मार्गे इच्छितस्थळी जाईल.
- तळेगाव तळे ओव्हर फ्लो झाल्याने आकार फाऊंडर्डी कंपनीकडून तळेगाव गावाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
वाहतूक ही सोमाटणे-लिंब फाटा अशी जाईल.
चाकण…
- फलके वस्ती येथील ओढा ओव्हर फ्लो झाल्याने फलके वस्ती ते मोई गावाकडे जाणारा रस्ता ड्रम लावून वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
- चक्रेश्वर रोड ते भुजबळ आळी रस्ता वाहतुकीस बंद आहे.
- सदर रस्ता हा अंतर्गत असल्याने वाहतूक इतर अंतर्गत रस्त्याने इच्छित स्थळी जाईल.
तळवडे…
- मोईगाव इंद्रायणी नदी पुलावर पाणी आल्याने मोई फाटा ते डायमंड चौक वाहतुकीस काल सायंकाळपासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे.
- ही वाहतूक डायमंड चौक-भारतमाता चौक डावीकडे वळून मोशी टोल नाका मोई फाटा मोईगावकडे वळविण्यात आली आहे.
वाकड…
- वाकड पोलीस ठाणे ताथवडे अंडरपासमधे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सदर ठिकाणाहून कार तसेच मो.सा यांना प्रवेश बंद करण्यात आलेला असून जड वाहनांकरीता प्रवेश चालु आहे.
- बिर्ला हॉस्पीटल ते रिव्हर व्हयुव चौक वाहतुकीस प्रवेश बंद.
- ही वाहने बिर्ला चौक येथून उजवीकडे वळून बारणे कॉर्नर-तापकीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
रावेत…
- समीर लॉन्स अंडरपास येथे ५ ते ७ फुट पाणी साचल्याने समिर लॉन्स अंडरपासकडे जाणारा सर्विस रस्ता तसेच समीर लॉन्स अंडरपास सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- ही वाहतूक मुंबई बेंगलोर हावेमार्गे इच्छित स्थळी जाईल.
चिंचवड..
- हेगडेवार ब्रिजकडून चिंचवड गावाकडे येणारी वाहतुक चित्तराव गणपती येथून येण्यास जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद आहे.
- पिंपरीगाव मार्गे भाटरनगर चिंचवडगाव येतील. लिंकरोड भाटनगर इच्छितस्थळी जातील.
- मोरया गोसावी मंदिर ते स्मशानभुमी जाणारा रस्ता बंद.
पिंपरी…
- खराळवाडी ग्रेड सेप्रेटरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने पुणे मुंबई जाणारा ग्रेडसेपरेटर सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्यात आलेला आहे.
- सर्विस रोडने पिंपरी पुल मार्गे मुंबई बाजूने इच्छित स्थळीजातील. मोरवाडी चौक डावीकडे वळून अजमेरा नेहरुनगर- वल्लभनगर नाशिक फाटा मार्गे पुणे बाजूकडे इच्छित स्थळी जातील.
भोसरी…
- पांजरपोळ क्लाऊड नाईन हॉटेल येथे पाणी आल्याने पांजरपोळ चौकाकडून भोसरीकडे जाणारी जड अवजड वाहने सोडून इतर वाहनांना वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
- सदर मार्गावरील वाहने स्पाईनरोड व इंद्रायणी नगर मार्गे ये-जा करतील.












