न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- गाडीमध्ये बाहेर आलेला कचरा आत दाबण्यास कचरा गाडीवरील चालक व लेबर यांना सांगितला. त्यावर ‘मी कचरा दाबुन घेणार नाही, तुला गरज असेल तर तु खाली उतर आणि कचरा दाबुन घे’ असं उलट उत्तर वरच्या पोस्टवर काम करणाऱ्या फिर्यादीला आरोपीने दिले. आरोपी क्र १ याने फिर्यादीला पकडुन आरोपी क्र २ याने कच-यातील घरगुती वापरातील चाकु त्यांच्या हातावर मारुन त्यांना जखमी करीत शिवीगाळ करुन व लाथाबुक्यांनी मारहाण केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २४) रोजी सकाळी ७.२० च्या सुमारास साई ज्योत पार्क, रहाटणी येथे घडला. फिर्यादी प्रशांत ज्ञानेश्वर ओझरकर यांनी आरोपी १) विवेक संतोष अडागळे (वय अंदाजे २८ वर्ष), २) अर्जुन गालफडे (वय अंदाजे २६ वर्ष) या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ८३२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सुर्यवंशी तपास करीत आहेत.


















