न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२४) :- दुचाकी चालकाने भरधाव वेगात गाडी चालवली. दोघेजण मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना पाठीमागुन धडक दिली. त्यात फिर्यादी यांना खाली रोडवर पाडुन जखमी होणेस आरोपी दुचाकीचालक कारणीभुत झाला आहे.
ही घटना (दि. २४) रोजी ०६.१५ वा चे सुमारास संजय कॉलनी समोरील रस्त्यावर, चिंचोली येथे घडली. फिर्यादी संजय हनुमंत सावंत (वय ५८ वर्षे, फोटोग्राफी व सामाजिक माहीती अधिकार कार्यकर्ता) यांनी आरोपी मिंलींद क्षिरसागर (वय ३० वर्षे रा. आकुर्डी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
देहुरोड पोलिसांनी ३५१/२०२४ भारतीय न्याय संहीता कायदा कलम २८१, १२५ (१), १२५ (२) व मो वा का कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. श्रेणी पोउपनि निंबाळे तपास करीत आहेत.















