- दौरा मार्गावरील वाहतुक इतरत्र वळवली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२४) :- देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या सोमवारी (दि. २९) रोजी पुण्यातील लवळे येथे एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. या दरम्यान मार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. (दि. २९) पहाटे ००.०१ वाजेपासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत दौरा मार्गावरील वाहतुक वळविण्यात आली आहे.
नांदेगाव-सनीज वर्ल्ड व सुस मार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद केली आहे. या मार्गावरील वाहतूक नांदेगाव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे अशी वळविण्यात आलेली आहे.
वाहनचालकांनी नांदेगाव सनीज वर्ल्ड व सुस मार्गे पुणे बाजुकडे न जाता त्यांनी नांदेगाव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


















