न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२४) :- “तु पोलीसांना व कोर्टात माझ्या विरोधात जबाब दिल्याने माझ्या मुलाला व पत्नीला जामीन झाला नाही. तु पोलीसांना आणि कोर्टाला दिलेला जबाब खोटा दिला आहे”. स्टॅम्प पेपरवर अफेडेव्हीट करुन दे नाहीतर, मी तुला या गुन्हयात अडकवून टाकेन व तुझे पण नाव घेईन. तसेच मी सुटल्यावर तुला जगु देणार नाही’ असे म्हणुन फिर्यादीला दमदाटी केली.
फिर्यादी हे गुन्ह्याच्या तपासात महत्वाचा साक्षीदार असल्याने आरोपीने फिर्यादीस खोटा जबाब देण्यासाठी दबाव टाकला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २२) रोजी सकाळी ०९.३० च्या सुमारास गुलाबनगर, दापोडी येथे घडला.
अतुल भिमराव खंडागळे (वय ३८ वर्षे, घंदा केबल कनेक्शन) यांनी आरोपी फिरोज उर्फ बा दिलावर शेख (वय ४२ वर्षे, रा. जयभिमनगर, दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४५८/२०२४भा.न्या.स. कलम २३२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मोहारे पुढील तपास करीत आहेत.














