न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२४) :- स्काईप अॅप (MUMBAI NCB DEPARTMENT) द्वारे ३६ वर्षीय महिलेला कॉल केला. आय.पी.एस. पोलीस अधिकारी बोलत असल्याचा बनाव रचला. ‘तुमच्या नावे इराण देशामध्ये पार्सल जात आहे व त्यामध्ये ड्रग्ज आहे व तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रींग व ड्रग ट्रॅफिकींगच्या केसेस होणार आहेत’ अशी भीती महिलेला घातली.
आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करीत एकुण २४,९९,९९८ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २३ ते दि. २५) रोजी फिर्यादी यांच्या घरी, हिंजवडी फेज ३ ता. मुळशी जि.पुणे येथे घडला.
याप्रकरणी महिलेने आरोपी १.आय.सी.आय.सी. आय बँकेचे खाते नंबर ५८८५०५५०००१२ धारक, २. स्काईप अॅपवर ९००९ MUMBAI NCB DEPARTMENT यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलीसांनी ८८२/२०२४ भारतीय न्याय सहिंता ३३६ (३), ३४० (२) ३१८, (४),३१६ (२) आय.टी. अॅक्ट ६६ (सी,) ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि झोल पुढील तपास करीत आहेत.















