- बिल्डरची कोटींची फसवणूक; पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२४) :- दस्त नोंद करुन देण्याचे कोणतेही अधिकार नसताना दोघांनी ६५०० चौ.मी. या क्षेत्रावर भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ‘शिवराम हाईटस्’ या प्रकल्पातील एकुण १० फ्लॅटची २,७७,०३,००० रुपयांमध्ये विक्री केली.
सदरची रक्कम स्वत:च्या फायदयासाठी वापरली. तसेच फिर्यादीने स्पेशल पावर ऑफ अॅटर्नी दस्त अन्वये या प्रकल्पातील फ्लॅट नं.१०१ व फ्लॅट नं. ६०३ चे अधिकार हे इतरास दिले आहेत. त्यातही आरोपींनी फ्लॅटची विक्री झालेली असताना देखील त्रयस्तास या फ्लॅटचे बनावट अॅग्रीमेंट/खरेदीखत करुन देत फिर्यादीची फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत म्हटल आहे.
ही घटना डिंसेबर २०१९ ते अद्यापपर्यंत शिवराम हाईटस्, खराळवाडी, पिंपरी येथे घडली आहे. फिर्यादी शाहजाद अख्तर अनिसुद्दिन (वय ५१ वर्ष, व्यवसाय बांधकाम) यांनी आरोपी १) महिला आरोपी, २) नामदेव बबन पडवळ (वय-५६ वर्षे, दोघे रा- दि मेट्रोपेलिटन सदन, लिंक रोड चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६७६/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६, ४१८, ४२०, ४२१, ४६५, ४६७, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि इंगळे पुढील तपास करीत आहेत.














