- आ. अमित गोरखेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२४) :- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरुपात व्हावा. यात राज्यातील नामवंत विचारवंत, साहित्यिक व कलाकार यांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे दर वर्षी 01 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट या दरम्यान ” प्रबोधन विचार पर्व ” च्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जातो. या जयंती उत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रातील थोर विचारवंत, कलावंत, यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचारांची आदान प्रदान केली जाते. त्या भव्य दिव्य कार्यक्रमाला महापालिकेकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील अध्यक्ष व समिती सदस्यांसोबत आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी अमित गोरखे म्हणाले, पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी मी सदैव तयार आहे. त्याचबरोबर महापालिका असो किंवा राज्य शासन असो यांच्या माध्यमातून मी नक्कीच येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात प्रयत्न करीन.














