- बावीस हजारांची रोकड असणारं पाकीट मूळ मालकाला केलं परत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षारक्षक भिमराव केकरे यांना महापालिका भवनात २२ हजार रूपये असलेले एक पाकिट मिळाले. त्यांनी ते प्रामाणिकपणे संबधित व्यक्तीस परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे महापालिका वर्तुळात कौतुक होत आहे.
सुरक्षारक्षक केकरे हे कार्यालयीन वेळ संपल्यानंतर संध्याकाळी महापालिकेतील चारही मजल्यावरील सर्व कार्यालये बंद आहेत की नाहीत याची तपासणी करत होते. त्यावेळेस त्यांना तिसऱ्या मजल्यावर एक पैशाने भरलेले पाकीट सापडले. ते खोलून पाहिले असता त्यात तब्बल २२ हजार रूपयांचा नोटा होत्या. ती बाब त्यांनी सुभाष कोकणे यांना सांगितली. त्यांनी पाकिटातील अतुल म्हेत्रे यांना पाकीट परत करताना सुरक्षारक्षक भीमराव केकरे. व्हिजिटींग कार्ड व कागदपत्राच्या मदतीने संबंधित व्यक्तीस संपर्क साधला. ते पाकीट अतुल म्हेत्रे यांचे होते.
ते महापालिकेत आल्यानंतर त्यांना ते पाकिट परत करण्यात आले. आपले पाकिट संपूर्ण रक्कमेसह सुरक्षितपणे पुन्हा मिळाल्याने म्हेत्रे हरखून गेले होते. त्यांनी भिमराव केकरे व सुभाष कोकणे यांचे आभार मानले. सुरक्षारक्षकांच्या या प्रामाणिकपणाची महापालिका वर्तुळात कौतुक होत आहे.

















