- रस्त्यावरच्या घटनेमुळे ग्रामस्त, व्यवसायिक दहशतीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- रस्त्यावरील पावसाचे साचलेले पाणी तरुणाच्या अंगावर उडाले. या कारणावरुन सात जणांच्या टोळक्याने तिघांना मारहाण व शिवीगाळ केली. हातामध्ये असणारा लोखंडी रॉड तरुणाच्या डोक्याला मारला. लाथाबुक्क्यांनी त्यानंतर चामड्याच्या पट्टयाने त्याला मारले.
तरुणाचे दोन मित्र यांनाही लाथाबक्क्यांनी मारहाण करून अश्लिल भाषेत शिव्या दिल्या. ‘तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला मारून टाकू’ अशी धमकी दिली. रस्त्यावर मारहाण करीत असताना त्या सर्वाच्या दहशतीमुळे लोकांनी दुकान बंद केले व लोकांनी आपली घरे बंद केली होती, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.२७) रोजी दुपारी ४.०० वा. इंद्रायणी इलेक्ट्रीकल हार्डवेअरजवळ, मेदनकरवाडी येथे घडली. आदित्य कैलास शिंदे (वय १८ वर्षे, व्यवसाय शिक्षण) याने आरोपी १) श्रेयस अरूण कुसाळकर (वय १९ वर्षे रा नाणेकरवाडी), २) श्रीपाद कुसाळकर, ३) मिथून माने, ४) निखील शेलार, ५) महेश मोहन राज (वय ३७ वर्षे रा नाणेकरवाडी), ६ व ७ (वय २०-२५ वर्षे वयोगटातील आणखी दोन जण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ५१८/२०२४ भा.न्या.सं. कलम १८९ (२),१८९ (४),१९१(२) (३),२९६,११०,११५(२), ११८(१), ३ (५) क्रिमीनल अमेंडमेट अॅक्ट ३,७ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी नं १ व ५ अटक आहेत. पोउपनि तलवाडे पुढील तपास करीत आहेत.


















