- मारेकरी तरुणाला साताऱ्यातून अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- आंबेठाण येथील एकतर्फी प्रेमातुन झालेल्या मुलीच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करुन १२ तासात त्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिट ३ ने अटक केली आहे.
आंबेठाण येथे एका मुलीच्या गळयावर चाकुने वार करुन खुन झालेला होता. मुलगी जागीच मरण पावली होती. मयत प्राची विजय माने (वय २१ वर्षे मुळगाव उरुण इस्लामपुर ता. वाळवा जि. सांगली सध्या रा. आंबेठाण ता. खेड) हीने एकतर्फी प्रेमातुन अविराज खरात (रा. बहे ता. वाळवा जि.पुणे) यास लग्नास नकार दिल्याच्या कारणावरुन चिडुन जावून चाकुने तिचे गळयावर व पोटावर वार करुन तिचा निघृण खुन करुन पळुन गेला होता. तसेच यातील मयत प्राची हीचा मोबाईल देखील त्याने पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने सोबत घेवून गेला होता.
तपास पथकांनी सातारा ते कराड महामार्ग एनएच ४ वर सापाळा रचुन १० ते १५ किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. पुढे पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पथकातील अंमलदारांनी जिवाची परवा न करता शिताफिने आरोपीला ताब्यात घेतले. त्याचेकडुन एकुण तीन मोबाईल व एक पल्सर मोटर सायकलसह ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपीस व गुन्हयातील मुददेमाल पुढील कारवाईकामी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. अशाप्रकारे आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना गुन्हे शाखा युनिट ३. पिंपरी चिंचवड कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण समांतर तपास करुन व माहीती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपुर्ण वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
















