न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२४) :- हिंजवडीतील शेल पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत टोळकं होतं. स्वतःजवळ दोन लोखंडी कोयते, एक लोखंडी पालघन, मिरची पावडर व दोरी अशी प्राणघातक हत्यारे त्यांनी बाळगली होती.
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांना कुणकुण लागताच (दि ३०) रोजी दुपारी ४:४५ च्या सुमारास लक्ष्मी पॅलेस बंगल्यासमोरील मैदानातील पडक्या रो- हाऊसमध्ये, साखरे वस्ती, हिंजवडी येथे कारवाई केली.
१) विष्णू दिगंबर पवार वय-२० वर्षे रा. मातोश्री हॉस्पीटल मागे, वडगाव मावळ, ता. मावळ, जि.पुणे, २) करण राहूल लोखंडे वय १८ वर्षे रा. मजीदजवळ, काळाखडक, वाकड, पुणे, ३) अरविंद अमर कोळी वय १८ वर्षे रा. शंकरवाडी, इंद्रायणी हॉटेलजवळ, देहू, पुणे, ४) साहिल सतिश सुरुशे वय १८ वर्षे रा. बाबा साखरे चाळ, गल्ली नं. ३, म्हातोबा मंदिररोड, हिंजवडी, पुणे, ५) ऋषिकेश जाधव रा. काळाखडक, वाकड, पुणे, ६) बाबू शेख रा. काळाखडक, वाकड, पुणे यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ८८९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट पोलीस अधि. १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपी क्र १ ते ४ यांना ताब्यात घेतले आहे. पोउपनि ताकतोडे तपास करीत आहेत.












