न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२४) :- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून हिरो होडा कंपनीची पॅशन गाडी यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर परवानगी नसताना देखील चालविली. देहुरोड एक्झिटकडुन विरुद्ध दिशेने जाताना ट्रकला धडक दिली.
अपघातात ट्रकच्या मागील चाकाखाली जाऊन दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. हा प्रकार (दि २९) रोजी सकाळी ८.५० वा. देहुरोड एक्झीटजवळ किवळे येथे घडला.
तपस विश्वास (वय ३१ वर्षे, रा. साईनगर, मामुर्डी) असं मयत तरुणाच नाव आहे. देहुरोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर ३६३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) मो. वा. का. कलम. १८४ १७७, ११९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. श्रेपोउपनि वाव्हळे तपास करीत आहेत.












