न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२४) :- बँकेच्या एटीएमचे कॅशडोअरचे लॉक कशाच्या तरी साहयाने तोडले. त्याचे नुकसान करून एटीएमचा दरवाजा तोडुन एटीएम मधील कॅश चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार (दि २९) रात्रौ ११.०० ते (दि ३०) सकाळी ०७.०० च्या दरम्यान सेक्टर ३२-अ, एचडीएफसी बँक, रावेत येथे घडला. फिर्यादी नीतु शिवणकर (एचडीएफसी बँक मॅनेजर) यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलीस ठाण्यात ३००/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ६२, ३२४ (४) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि कुंभार तपास करीत आहेत.












