- महाळुंगे आणि चाकण भागातील लोकांकडून सुटकेचा निश्वास..
- पोलिसांनी नागरिकांना केलयं हे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२४) :- खेड तालुक्यात महाळुंगे ग्रामीण भागात शेती व नविन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागाकडून उभारण्यात आलेले विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. शेतकरी व औद्योगिक वसाहतींचे मोठया प्रमाणात नुकसान होत होते. या घटना रोखण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणणे हे पोलीसांसाठी आव्हानात्मक ठरले होते.
विद्युत रोहित्र चोरीच्या गुन्हयांना पायबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तात्काळ गुन्हे दाखल करुन जलदगतीने तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ-३ चे पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार, चाकण विभागचे सहा. पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शना नुसार महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली.
विद्युत रोहित्र चोरीचे ठिकाणे हे ग्रामीण व दुर्गम भागातील निर्जन जागेत, नविन औद्योगिक वसाहत सुरु होत असल्याच्या निर्जन ठिकाणी असत. चोरीच्या घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन येत नव्हते, त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यामध्ये तपास पथकांना अडचणी येत होत्या. अशा बिकट स्थितीत तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांनी रोहित्र चोरीचे कालावधीं, वार, वेळ यांचा बारकाईने अभ्यास करुन परिसरात संशयीतरित्या वावरणाऱ्या लोकांची माहिती प्राप्त केली. चोरी बाबत घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करुन काही संशयीत व्यक्तींना ताब्यात घेवुन कसून तपास केला. त्यांनी विद्युत रोहित्र मधील तांब्यांच्या तारा चोरल्याची कबुली दिली. आरोपी यांच्याकडुन विद्युत रोहित्रामधील तांब्याचे तारा व पट्टया, रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य-लहान मोठ्या आकाराचे पान्हे, पक्कड, हातोडी इ. तसेच गुन्हयासाठी वापरेली वाहने इंडीका कार व इतर चोरलेल्या दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) रमेश उर्फ राहुल बाळु पडवळ, वय २७ वर्ष, राहणार निमगाव दावडी, ता-खेड जि पुणे, २) सुनिल उर्फ सैराट शिवाजी गावडे, वय २१ वर्ष राहणार निमगाव दावडी, ता खेड जि पुणे, ३) सुनिल सुरेश गावडे, वय २३ वर्ष, राहणार खडकी पिंपळगाव, ता आंबेगाव, जि पुणे, ४) रविद्र सुरेश गावडे, वय २३ वर्ष राहणार खडकी ५ पिंपळगाव, ता आंबेगाव, जि पुणे), उस्मान बिलाल अब्दुल अब्बुहरेरा, वय २० वर्ष, राहणार हन्टसमन चौक, भांबोली ता खेड जि पुणे, ६) कार्तिक नामदेव पवार, वय २५ वर्ष, राहणार राक्षेवाडी, ता-खेड जि पुणे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपी क्र १ ते ३ हे सराईत गुन्हेगार असुन त्यापैकी आरोपी क्र १) रमेश उर्फ राहुल बाळु पडवळ याचेवर अहमदनगर व पुणे जिल्हातील वेगवेगळया पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे एकुण १६ गुन्हे दाखल आहेत, आरोपी क्र २ सुनिल उर्फ सैराट शिवाजी गावडे यांचेवर चोरीचे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी क्र ३ सुनिल सुरेश गावडे याचेवर चोरीचा ०१ गुन्हा दाखल असल्याचे आढळुन आले आहे. आरोपीकडून १) २,७५,०००/रु किंमतीचे ३४० किलो वजनाचे तांब्याचे तारा व पट्टया (वेगवेगळया विद्युत रोहित्रांमधील) २) ५,२५,०००/रु किंमतीची गुन्हयात वापरलेली व चोरलेली वाहने (एक इंडीका चारचाकी व पाच दुचाकी वाहने) जप्त करण्यात आली आहेत.
आरोपींची गुन्हे करण्याची पध्दत…
निर्जन व दुर्गम भागात असलेल्या शेती तसेच नविन तयार होत असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी उभारण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर हेरुन रात्रीच्या वेळी त्यास असलेले डि.ओ.चा खटका बंद करुन त्यातील विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट करणे व ट्रान्सफॉर्मर बॉक्स खाली पाडुन त्यातील तांब्याचे तारा चोरुने नेणे.
पोलीसांचे आवाहन…
नागरिकांनी शेती व निर्जन ठिकाणांचे जवळील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) यांचे ठिकाणी कोणी अनोळखी इसम वावरत असल्याचे आढळुन आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.













3 Comments
Roberto Holcroft
I was studying some of your content on this website and I conceive this website is really instructive! Retain posting.
Watch Baseball Games Online
Dead indited written content, Really enjoyed reading through.
Free Tennis Streaming
Hey there! I’m at work browsing your blog from my new apple iphone! Just wanted to say I love reading through your blog and look forward to all your posts! Keep up the outstanding work!