- सांगवीतील बांधकाम व्यवसायिकाची कोटींची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- युनिव्हर्सल इंजिनिअरींग कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम करण्याचे दोघांनी कॉन्ट्रक्ट दिले होते. त्याप्रमाणे कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले, दोघांना त्याचा ताबा दिला. परंतू, त्या बदल्यात बांधकामाची ठरलेली रक्कम व आर्थिक अडचणी वेळी दिलेली अशी एकुण पाच कोटी १० लाख रुपये ही रक्कम फिर्यादी यांना दोघांनी दिली नाही.
उलट रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाच्या परिपत्रकानुसार युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झालेल्या कॉर्पोरेशन बँकेचे न वटणारे व त्यावर चुकीच्या पध्दतीने रक्कम नमूद केलेले दोन चेक्स आरोपींनी फिर्यादी यांना देऊन त्यांची फसवणुक केली, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार मार्च २००९ रोजी ते दि ३०/०६/२०२४ दरम्यान सावित्री कन्स्ट्रक्शन, काशीद पार्क, पिंपळे गुरव येथे घडला.
फिर्यादी किशोर शंकर गारवे (वय ६७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. नवी सांगवी) यांनी आरोपी १) सज्जन पंडीतराव देशमुख, २) श्याम सज्जन देशमुख (दोघे रा. वारजे नाका, युनिव्हर्स इमारती समोर, एन.डी.ए रोड पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ३१६/२०२४ भा.द.वि. कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. वपोनि बनसोडे तपास करीत आहेत.














