न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- दापोडीतील त्रिलोक्य बुद्ध विहार समोर (दि. ३) रोजी दुपारी एकच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पुरूष जातीचे अर्भक आढळले आहे.
त्याचे वय अंदाजे १ ते २ दिवस इतके आहे. अज्ञाताने ते रस्त्यावर फेकूण दिले आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात ४७६/२०२४, भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि शेख हे करीत आहेत.














