न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२४) :- कंपनीतील ड्रायव्हर (मयत) गणेश शत्रुघ्न राय (वय ४९ वर्षे रा. बिहार) हा रस्ता क्रॉस करीत होता. त्यावेळी पीएमपीएल बस (एम.एच.१४/एच.यु.५८१८) वरिल चालकाने त्याच्या ताब्यातील पीएमपीएल बस ही भरधाव वेगात चालवुन वासुली फाटा ते करंजवीहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेट्रापॅक कंपनी मटेरीयल गेटसमोर (दि.६) रोजी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास ड्रायव्हर गणेशला धडक दिली.
अपघातामध्ये त्याच्या डोक्यास मार लागुन तो मरण पावला. त्याच्या मरणास आरोपी चालक कारणीभूत झाला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी अंश कामेश्वर सिंग कुमार (वय २२ वर्षे, बिहार) यांनी आरोपी रामराव परशराम राठोड (वय ४५ वर्षे रा. समर्थनगर, दिघी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ५१२/२०२४ बी एन एस कलम १०६, २८१,१२५ (बी). मो.वा.का.क. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोसई डी. एस. जाधव तपास करीत आहेत.












