न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२४) :- कॅफेशॉपचा कोणताही परवाना नसताना शॉपचा बोर्ड लावला. पहिल्या मजल्यावरील रुममध्ये ०३ बाय ०३ लांबी रुंदीचे प्लायवुडचे व सुमारे पाच फुट उंचीचे ०८ कप्पे असून त्यांना अनुक्रमे १ ते ८ क्रमांक दिलेले पोलिसांना आढळले. त्यास बाहेरच्या बाजुने पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवले.
मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. ही घटना (दि.०८) रोजी सकाळी १२.१५ वा. सुमारास, डी वाय पाटील रोड, रावेत प येथील यु अॅन्ड मी कॅफेमध्ये घडला.
याप्रकरणी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने आरोपी महेश अजिनाथ जाधव (वय २७ रा. पंचवटी सोसायटी, रावेत) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी ३०३/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२९, १३१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. एस.डी कोळगे तपास करीत आहेत.












