न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२४) :- पोलिस दलातील दोन पोलिस निरीक्षक, दहा सहायक पोलिस निरीक्षक आणि ११ पोलिस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश गुरुवारी (दि. ८) रात्री उशिरा देण्यात आले.
शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी निगडीच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम यांची बदली झाली आहे. तर नियंत्रण कक्षातून दहा सहायक निरीक्षक, ११ उपनिरीक्षक यांना विविध ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षकामध्ये अभिनय थोरात यांची (गुन्हे शाखा), मधुकर पवार (वाहतूकशाखा). युवराज कलगुटगे (सांगवी पोलिस स्टेशन), तानाजी कदम (निगडी पोलिस स्टेशन), ज्योती तांबे (विशेष शाखा), सुभाष चव्हाण (वाकड पोलिस स्टेशन), नवनाथ मोटे (चिखली पोलिस स्टेशन), आसाराम चव्हाण (वाहतूक शाखा), गणपत धायगुडे (चाकण पोलिस स्टेशन), जोहेब शेख (देहूरोड पोलिस स्टेशन) बदली झाली आहे. तर पोलिस
उपनिरीक्षकांमध्ये अशोक शिर्के (निगडी पोलिस स्टेशन), बाबासाहेब साळुंखे (वाकड पोलिस स्टेशन), लक्ष्मण आकमवाड (सांगवी पोलिस स्टेशन), पंकज महाजन (भोसरी पोलिस स्टेशन), मयुरेश साळुंखे (गुन्हे शाखा), सारंग ठाकरे (हिंजवडी पोलिस स्टेशन), शुभांगी मगदूम (दिघी पोलिस स्टेशन), अनिस मुल्ला (महाळुंगे पोलिस स्टेशन) ज्ञानेश्वर धनगर (वाहतूक शाखा), अनिता दुगायकर (देहूरोड पोलिस स्टेशन), महेंद्र सपकाळ (वाहतूक शाखा) यांची बदली झाली आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या विविध पोलिस ठाण्यामध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्तालयातून जारी केले आहेत.















