न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- काळेवाडीतील पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ अजित पवार यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी देखील त्यांनी उल्लेख केला. बारणे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर काहीही सांगितलं असलं तरी मी त्यांचं काम केलं आहे. हे त्यांच्या मुलाला माहीत आहे. असं पार्थ पवार यांनी सांगितलं. मावळमधून संजोग वाघेरे पुढे होते. बारणे निवडून येतील अशी परिस्थिती नव्हती, असे म्हणायला पार्थ पवार विसरले नाहीत.
पार्थ पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरात आधीपासूनच सक्रिय होतो. पक्षाचे अनेक जण सोडून गेले आहेत. लोक आपल्या सोबत आहेत की नाही, याची पाहणी करतो आहे. शहराध्यक्ष पदाबाबत अजित पवार हे अंतिम निर्णय घेतील. पण आमच्यासाठी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते शहराध्यक्षच आहेत. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा ही माझी इच्छा आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा पूर्वीचा बालेकिल्ला आहे. मला आमदार किंवा खासदार व्हायचं नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे आहे, असे बोलायलाही ते विसरले नाहीत.



















2 Comments
Keren Maisonet
I was reading through some of your blog posts on this website and I think this website is rattling instructive! Continue putting up.
watch NHL online
fascinate este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este conteúdo. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂