न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- भोईरवाडी, फेज ३, ता. मुळशी येथील “३२ पाईन वुड ड्राईव्ह” या बांधकाम साईटवर कामगाराचा १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.
काँक्रीटचे काम करीत असताना सुरक्षा साहित्य न वापरल्यामुळे खाली पडून त्याच्या डोक्याला मार लागला. त्यातच तो मयत झाला. सबंधित आरोपी यांनी हयगय व निष्काळजीपणाने बेदरकार कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान आकस्मात मयत याप्रकरणात चौकशी सुरु असताना हा प्रकार निदर्शनास आला आहे. ही घटना (दि.३०/०७/२०२४) रोजी वेळ ११/०० वा. ते ११/३० वा. चे दरम्यान घडली.
आरोपी १) शहाजान शेख (वय ३५ वर्षे, रा. म्हाळुंगे), २) अमीत शांताराम चव्हाण (वय २९ वर्षे, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) या दोघांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ९३३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि कांदे तपास करीत आहेत.














