न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- २५ वर्षीय विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला. माहेरुन बुलेट गाडी व सोन्याच्या अंगठीची मागणी केली. भांडण करुन मानसिक व शारीरीक त्रास दिला. त्याला कंटाळुन विवाहितेने राहत्या घरामध्ये साडीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.
फिर्यादीची विवाहित मुलीला तिचा पती, आरोपी क्र.१ ते ३ यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि.०७) रोजी ८.०० वा. चे परिस कॉलनी बेबी इंग्लीश स्कुलजवळ, काळेवाडी येथे घडली.
याप्रकरणी महीला फिर्यादी यांनी आरोपी १) पती लोकेश भारत इंगळे (वय ३० वर्षे रा. मोरया कॉलनी, तुळजा भावानी मंदीरा शेजारी तापकीरनगर, काळेवाडी), २) सासु (वय अंदाजे ४५ वर्ष), ३) दिर सोमु इंगळे (वय अंदाजे २५ वर्ष, रा. मोरया कॉलनी, तुळजा भावानी मंदीरा शेजारी, तापकीरनगर काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ८८९/२०२४ बी एन एस कलम १०८,८५ सह हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कलम ४ प्रमाणे तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि नलावडे पुढील तपास करीत आहेत.














