न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- घेतलेले पैसे परत मागितले असता खोटे गुन्हे दाखल करणार, मिडीयामध्ये बदनामी करणार, आम्ही तुझ्या घरी येवुन बसणार व तिथे तमाशा करणार अशी धमकी देवून तरुणाला चौघांनी घेराव घातला. त्यामुळे घाबरून निघुन जाण्याचा तरुणाने प्रयत्न केला असता त्याला सर्व बाजुने घेरुन, तु कोठेही जाणार नाही, जागेवर बस, असे म्हणून धमकावले. हाताने मारहाण केली.
तसेच ‘तु पैसे मागितलास तर तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिली. फोन करुन आम्ही तुझ्या घराच्या बाहेर थांबलो आहोत, तु बाहेर ये, नाहीतर आम्ही तुझ्या घरी येवुन तमाशा करु, अशी धमकी देवुन आरोपी निघुन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १०) रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास चाय चस्का कॅफे समोर, वाकड येथे घडला.
फिर्यादी संचित बबनराव पंडित (वय ३८ वर्ष, वाकड) यांनी आरोपी १) कैलास खुशाल सोनवणे (वय ३८ वर्ष), २) योगेश खुशाल सोनवणे (वय ३६ वर्ष दोघे रा. गोविंद गार्डन जवळ पिंपळे सौदागर), ३) दिनेश चतुर पवार (वय ३० वर्ष), ४) अनिल साळुंखे (वय ५५ वर्ष) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ८८८/२०२४, भारतीय न्यायसंहिता कलम १२६ (२), ३५१(२) (३),११५ (२),३(५) प्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव तपास करीत आहेत.














