न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी येथील ऑल इंडिया सलमानी जमात व जनाधिकार संघटना यांच्या वतीने निगडी-आकुर्डी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी निगडी-आकुर्डीतील पदपथ व रस्त्याची स्वच्छता तसेच वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नागरिकांना औषधी रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांना स्वच्छता व वृक्षसंवर्धनातून निसर्ग संवर्धन करण्याचा यावेळी संदेश देण्यात आला.
यावेळी सलमानी जमातचे अध्यक्ष नसिम शेख, जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजिद शेख, शमशीर शेख, युनुस शेख, मुन्ना शेख, सिद्दिक शेख आदी उपस्थित होते.











