- मद्यपी आणि समाज कंटकांचे मोरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले..
- महापालिकेने मोरांना ताबडतोब सुरक्षा प्रदान करावी – सचिन काळभोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२४) :- निगडी येथील दुर्गा देवी टेकडी आणि एमआयडीसी पाणी पुरवठा परिसरात मोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पर्यटनासाठी आलेले काही समाजकंटक त्या मोरांना दगड किंवा इतर वस्तु फेकून मारत आहेत. त्यामुळे मोर घाबरून पळून जात आहेत. मोरांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब सुरक्षा द्यावी. जेणेकरून मोर सुरक्षितपणे वावरतील, अशी मागणी शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे महापालिकेकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा दुर्गा देवी टेकडीवर खूप मोठ्या प्रमाणावर वावर आहे. हे मोर झाडांवर बसतं आहे किंवा फिरताना दिसत आहे. बी आर टी रस्ता ह्या ठिकाणी बाहेरच्या बाजूने मोराना दगड मारल्याने मोर घाबरून आतमध्ये पळून जात आहे. तसेच पाणी पुरवठा केन्द्र रेल्वे लाईन रुळाच्या बाजूला तसेच एम आय डी सी भागात मोर मोठ्या प्रमाणावर वाढले असून काही समाजकंटक एम आय डी सी पाणी पुरवठा केन्द्र ह्या ठिकाणी आतमध्ये दारू पिण्यासाठी जात असून त्या ठिकाणी मोराना मारहाण तसेच घाबरविले जाण्यासाठी प्रयत्न केला जात असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मोराची जनगणना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्याकडून करुन त्या मोराना ताबडतोब सुरक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी पुरवावी, तसेच जे व्यक्ती मोर ह्या राष्ट्रीय पक्षी ह्यांना मारहाण करत आहे त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.















