न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- पुण्यातील जनता सहकारी बँकेच्या धनकवडी शाखेने फ्लॅट नं.४०१, शिवसाई अपार्टमेंट, पिंपळे सौदागर हा अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या हुकुमावरुन जप्त केला होता. त्यास नायब तहसिलदार, हवेली जिल्हा-पुणे यांनी लॉक करुन सिल केले.
तसेच मूख्य दरवाजावर प्रॉपर्टी जप्त केल्याबाबत नोटीस लावलेली होती. असे असताना महिलेन घरामध्ये बेकायदेशीर गृहअतिक्रमण केले, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी दुपारी ३.०० वा च्या सुमारास घडला. फिर्यादी चरण इंद्रजीत तितरे (वय ३९ वर्षे) यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ३३९/२०२४, बी..एन.एस. कलम ३२९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पो. हवा. मोराळे तपास करीत आहेत.















