न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२४) :- चैनीसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. चोरांकडुन चोरीच्या ०५ दुचाकी व १ रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
अक्षय बाबुलाल राकावत (वय २८, रा. गायकवाड नगर, जांबे, मुळ रा. जोधपुर, राजस्थान, २) मदनलाल छोटुराम देवासी (वय २५, रा. गायकवाड नगर, जांबे, मुळ गाव रा. पाली, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
दरम्यान (दि. २१) रोजी लक्ष्मी चौक, मारूंजी रोड येथे सापळा लावुन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. आरोपींना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या ४ दुचाकी व १ ऑटो रिक्षा चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्या दुचाकी व रिक्षा जप्त करून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.












