न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२४) :- अल्पवयीन मुलीला गाडी शिकवतो असे सांगुन दुचाकीवर समोर बसवले. फिर्यादीसह तिच्या दहा वर्षांच्या मैत्रीनीसोबत गाडी शिकवायच्या बहाण्याने वारंवार अश्लील चाळे केले. दोघींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार मे २०२४ ते २१/०८/२०२४ रोजी शरदचंद्र विद्यालय, वडगाव घेणंद शाळेसमोर, वडगाव घेणंद, ता. खेड, जि. पुणे येथे घडला. फिर्यादी वय १२ वर्षे ०६ महिने (शिक्षण) हिने आरोपी इम्साईल इब्राहिम शेख (वय ३२ वर्षे, धंदा मजुरी, रा. वडगाव घेणंद, ता. खेड, जि. पुणे मुळ रा- बार्शी नाका, खाजबाग गल्ली, बीड) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
आळंदी पोलिसांनी २३७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७५,७८ बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधि कलम ८,१०, १२ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोउपनि खडके तपास करीत आहेत.












