न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- हॉटलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गि-हाईकांची गर्दी केली. त्यांना जेवणास व हुक्क्यास एकत्र बसवले. विनापरवाना, अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या २४५० रु. की. चा हुक्का पॉट व हुक्का फ्लेवर विक्री करीता जवळ बाळगला.
ही घटना (दि. २५) रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास द बी ५ स्फटॉप हॉटेल, विनोदेवस्ती, भुमकर चौककडे जाणारा रोड़, हिंजवडी येथे घडली.
याप्रकरणी १) संजित जोंग्रेद्र साहु वय २१ वर्ष, धंदा हॉटेल वेटर, रा. द बी ५ स्फटॉप हॉटेल स्टापरुम, विनोदेवस्ती, भुमकर चौककडे जाणारा रोड़, हिंजवडी, पुणे मुळ राहणार जाजपुर, कुआखिआ, २) शिवु गीर बुढाथोकी, वय २० वर्ष, धंदा हॉटेल वेटर, रा. द बी ५ स्फटॉप हॉटेल स्टापरुम, विनोदेवस्ती, भुमकर चौककडे जाणारा रोड़, हिंजवडी, पुणे, मुळ राहणार. गाव मारशीबंग, तहसील पिउथान, नेपाल. ३) शाहीद शेख (हॉटेल मॅनेजर), ४) सुदर्शन ( हाँटेल मॅनेजर), ५) तुषार भुमकर (हॉटेल चालक मालक) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ९७०/२०२४ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम (जाहीरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा, व वितरण) सन २००३ चे कलम ४,२१ व भा. न्याय सहिता २०२३ चे कलम- २२३,२७१,२८७,३(५) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि पांचाळ पुढील तपास करीत आहेत.












