न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी कॅम्पातील जय आंबे ऑटो स्पेअर्स दुकानामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता दुसऱ्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या होंडा कंपनीचे बनावट स्पेअरपार्ट विक्री करीत असताना व विक्री करीता ठेवले.
तब्बल ६६,९५३ रु. की. च्या माल दुकानात मिळून आला आहे. हा प्रकार (दि. २६) रोजी दुपारी ३.४५ ते ५. ४५ च्या दरम्यान उघडकीस आला. फिर्यादी रेवननाथ विष्णु केकान (वय ४१ वर्षे) यांनी आरोपी महेंद्र लेडुमल साधवानी (वय ५८ वर्षे रा. विजयनगर, काळेवाडी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७४६/२०२४ कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि कापरे पुढील तपास करीत आहेत.












