न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- HRCR PLATE COIL हा माल देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. फिर्यादीकडुन ६,९८,९१२ रूपये आर.टी.जी.एस व्दारे प्राप्त केले. कोणत्याही प्रकारचा माल न देता व पैसेही परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४/०२/२०२४ रोजी १०.०० वा ते (दि.२०/०२/२०२४ रोजी ११.३० वाजता) युनियन बँक, चाकण शिक्रापूर रोड येथे घडला. महिला फिर्यादी (वय ३५ वर्षे, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी आरोपी फ्रान्ससिंस डिसोजा सेल्स सर्विस एक्झीक्युटीव्ह (गुलालवाडी सर्कल जवळ, मुंबई) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ५९८/२०२४ भारतीय दंड संहिता ४०६, ४२० IT ACT 66 (D) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि घार्गे पुढील तपास करीत आहेत.











