न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- देहरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडुन १४,४५,००० रुपये किंमतीच्या २१ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. तसेच एकूण मोटार वाहन चोरीचे २१ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) आकाश शंकर जाधव (वय २४ वर्ष, रा. टॉवर लाईन, चिखली, मु.पत्ता. कोळसुर, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद), २) आशुतोष नानासाहेब घोडके (वय २३ वर्ष रा. गुरदत्त हौ. सोसायटी, त्रिवेणीनगर, टॉवलाईन, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. देहुरोड बाजार परीसरात स्वामी चौक येथे सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून आरोपींच्या ताब्यातून नागझरी, ता. जि.बीड येथुन चोरी केलेल्या २१ मोटर सायकली जप्त केल्या आहेत. आरोपी यांची (दि. ०५) पर्यंत पोलीस कोठडी असुन त्यांची अधिक पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.











