न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला खाणीमध्ये ढकलून देत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेआठ वाजता देहूरोड येथील ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी उघडकीस आली.
अजय जोगिंदर लुक्कड (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल चंदू सकट (वय १८), प्रेम सचिन मोरे (१९), ओमकार ऊर् गणेश रवींद्र पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सहायक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देहूरोड-कात्रज बायपास रोडवर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देहरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अजय लुक्कड हा तरुण मृतावस्थेत आढळून आला.










