न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांचा यावर्षीचा जिल्हास्तरीय युवक महोत्सव ‘जल्लोष २०२४ चिंचवडच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयात सोमवार दि.२३ रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.
या जल्लोष २०२४ मध्ये पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर येथील ५५० महाविद्यालयांतील अंदाजे १००० विद्यार्थी कलावंत सहभागी होत आहेत. या जल्लोषात एकांकिका, वक्तृत्व, वादविवाद, शास्त्रीय गायन, नृत्य इ.२७ ललितकला प्रकारांमध्ये विद्यार्थी आपली कला प्रदर्शित करणार आहेत. ‘जल्लोष’ चे उदघाटन सकाळी आठ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. जल्लोषचा पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी सायंकाळी महाविद्यालयाच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलासदनात होणार आहे.
या समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर हे प्रमुख अतिथी असून या प्रसंगी विद्यापरिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि रवींद्र शिंगणापूरकर उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्ष स्थान कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा भूषविणार असून जिल्हा समन्वयक डॉ. लहू गायकवाड, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. भूपाली शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, मुख्य प्रशाकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, संयोजक प्रा. रोहित अकोलकर, प्रा. ज्योती इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.











4 Comments
Lynelle Vanderpool
I’ll immediately grab your rss feed as I can not in finding your e-mail subscription link or newsletter service. Do you have any? Please allow me realize in order that I may subscribe. Thanks.
Watch Live Sports Now
Hey would you mind stating which blog platform you’re using? I’m going to start my own blog in the near future but I’m having a tough time deciding between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal. The reason I ask is because your design and style seems different then most blogs and I’m looking for something unique. P.S Sorry for being off-topic but I had to ask!
Live Champions League Matches
You are my intake, I have few web logs and infrequently run out from post :). “To die for a religion is easier than to live it absolutely.” by Jorge Luis Borges.
Tennis Matches Online
incrível este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até mais. 🙂